Satara | कऱ्हाड विमानतळाच्या अटींविरोधात जनआंदोलन उभारणार; 'जनशक्ती'चा इशारा ;पाहा व्हिडीओ

2021-11-10 136

धळं दळतंय अन् कुत्र पीठ खातंय, असा प्रकार विमानतळाच्या (Karad Airport) वीस किलोमीटरच्या नियमाबाबत झाला आहे. त्याबाबत सात दिवसांत अपेक्षित निर्णय न झाल्यास जनआंदोलन करणार आहोत, असा इशारा जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्र यादव (Janshakti Aghadi leader Rajendra Yadav) यांनी दिला आहे. कऱ्हाडकरांच्या भावना लक्षात न घेतल्यास महामार्गावर चक्का जाम आंदोलनासह कऱ्हाड बचाव आंदोलन करण्याचा इशाराही यादव यांनी दिला आहे. त्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालायत जनहित याचिका दाखल करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जनशक्तीचे नगरसेवक हणमंत पवार, विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, सुप्रिया खराडे, आशा मुळे, प्रियांका यादव, गजेंद्र कांबळे, किरण पाटील, बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते. #satara #airport #karhad #sakal #maharastra

Free Traffic Exchange

Videos similaires